Type to search

Featured जळगाव

जळगाव : ग.स.सोसायटी उपाध्यक्षपदी लोकसहकार गटाचे सुनील पाटील यांची बिनविरोध निवड

Share

३० वर्षानंतर ग्रामसेवक संवर्गाला मिळाला न्याय

जळगाव

ग.स.सोसायटीच्या उपाध्यक्षपदासाठी लोकसहकार गटाचे संचालक सुनील अमृत पाटील यांचा एकमेव अर्ज आला. तर सहकार गटाने उमेदवार न देता सर्व संचालकांची त्यांच्या नावाचा ठराव मंजूर करुन सुनील अमृत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

गेल्या २५ ते ३० वर्षात प्रथमच बिनविरोध निवडीचा चांगला पायंडा पाडल्याचे समाधान संचालकांनी व्यक्त केले. निवडणूक निर्णय अधिकारी के.पी.पाटील, सहाय्यक म्हणून भाऊसाहेब महाले यांनी काम पाहिले. दरम्यान, सुनील पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड केल्याने ग्रामसेवकांची मान अभिमानाने उंचावली आहे.

गेल्या ३० वर्षानंतर ग्रामसेवक संवर्गाला न्याय मिळाला. त्यामुळे लोकसहकार व सहकार गटाचे आभारी आहोत, अशी भावना ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एस.ए. निकम यांनी व्यक्त केली. तसेच लोकसहकार गटाच्या माध्यमातून सभासदांना १० टक्के लाभांश देण्यासाठी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही नवनिर्वाचित ग.स.सोसायटीचे उपाध्यक्ष सुनील पाटील यांनी दिली.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!