Type to search

DT Crime Watch Featured जळगाव

जळगाव : कौटुंबिक वादातून पित्यानेच केली मुलीची हत्या

Share
पाचुंदा येथे शेतीच्या वादातून कुर्‍हाडीच्या दांड्याने मारहाण, Latest News Crime News Newasa

जळगाव | 

शहरापासून जवळच असलेल्या बांभोरी गावाजवळील गिरणानदीच्या पात्रात एका सात वर्षीय बालिकेचा मृतदेह दुपारच्या सुमारास आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

दरम्यान, संदीप यादवराव चौधरी (करणगाव, ता. अमळनेर) हा सध्या जळगाव तालुका पोलीस स्थानकाच्या परिसरात राहतो.

तो वेल्डींगच्या दुकानात काम करून उपजीविका करीत असून बुधवारी सायंकाळी त्याने पत्नीला फोन करून आपण आपल्या मुलीची हत्या करणार असल्याचा एसएमएस केला होता.

आज सकाळी सात वाजता त्याने क्लासमधून मुलीला घेऊन गेला. त्यानंतर दुपारी गिरणा नदीच्या पुलाखाली त्याच्या मुलीचा मृतदेह आढळून आला.

कौटुंबिक वादातून स्वत:च्या सात वर्षीय मुलीस मारून टाकल्याने परिसरात स्मशान शांतता आहे. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!