Type to search

Breaking News Featured जळगाव

जळगाव : मुलीची हत्या करणाऱ्या पित्यास पारोळ्यात अटक

Share
jalgaon-daughter murdered by father arrested

जळगावातील घटना, घरगुती वादातुन वडीलांनी केला मुलीचा गळा आवळुन खुन

 

(योगेश पाटील)

पारोळा –

जळगाव खोटे नगर येथील चौधरी कुटुंबात घरगुती वादातुन पित्याने त्याच्या चारवर्षीय चिमुकलीचा महामार्गावरिल गिरणा नदीचा पुलाखाली गळा आवळुन खुण केल्याची घटना दि.8 रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,खोटे नगर जळगांव येथील रहीवाशी संदीप यादव चौधरी मुळगांव करणखेडा ता.अमळनेर पत्नी नयना चौधरी व मुलगी कोमल असे राहत असुन संदीप हा जळगांव येथील एका वेल्डींग वर्कशॉपवर कामाला असतांना दरम्यान पती पत्नीत घरगुती कारणावरुन वाद निर्माण होत होते.

नेहमीचे वाद पाहता दि.8 रोजी संदीप हा कामावर असतांना दुपारी 4 वाजता मालक मयुर चौधरी यास मी  बैठकीस जातो असे सांगुन निघुन गेला. त्यानंतर तो मुलगीस खाजगी शिकवणी वर्गात घेण्यासाठी गेला तेथुन मुलीसोबत तो गिरणा नदीच्या पुलाखाली घेऊन जावुन तिचा गळा आवळुन खून केला आणि तिला तेथेच फेकुन दिले.

त्यानंतर तो बसने पारोळा मार्गे धुळे येते गेला त्या दरम्यान त्याचा मोबाईल बंद होता. त्याने धुळे येथे मोबाईल चालु करुन त्याचे मालक मयुर चौधरी यांना मेसेज द्वारे घडलेली घटना सांगितली.

मालक यांनी नातेवाईक व पोलिसांना सांगितल्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी जावुन पंचनामा करुन शव ताब्यात घेऊन पारोळा व अमळनेर पोलिसांना याबाबत आरोपीचे वर्णन व त्याने केलेले कृत्याची माहीती सांगितली.

त्या दरम्यान मुलगी घरी न आल्याने कालच जळगाव तालुका पोलिसात दि.8 रोजी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.

यावेळी पोलिसांनी मुलीचा शोधाशोध केला. परंतु मुलगी घरी न आल्याने आईने हंबरडा फोडीत शोध घेण्याचे आवाहन केले. परंतु मुलीस स्वत:च्या पित्याने खाजगी क्लास येथुन नेत तिचा गळा आवळुन खुन केल्याचे त्याने सांगितले.

याबाबत दि.9 रोजी पारोळा पोलिस स्टेशनचे गोपनीय शाखेचे पंकज राठोड व सुनिल साळुंखे यांनी गाव परिसरात वरिल त्याचा शोध घेतला असता संदीप चौधरी यास म्हसवे शिवारातील एका दारु अड्ड्याजवळुन ताब्यात घेतले.

यावेळी पोलिसांनी त्यास घटनेची माहीती विचारली असता त्याने वरिल प्रमाणे हकीकत सांगितली.

यावेळी आरोपीस  ताब्यात घेऊन त्याची वैद्यकिय तपासणी करुन जळगांव तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे ताब्यात दिले. दरम्यान सदर घटनेबाबत जनमाणसात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!