Type to search

DT Crime Watch Featured जळगाव

जळगाव : दारुच्या नशेत पतीने पत्नीवर केला चाकू हल्ला

Share
Jalgaon

जळगाव | प्रतिनिधी

दारुच्या व्यसनामुळे पत्नी घरात राहू देत नसल्याने संतापाच्या भरात चाकूने वार करुन पत्नी गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास झाली. याबाबत महिलेच्या पतीस जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे घरात सर्वत्र रक्त पडले असून हल्ला करणार्‍याचे कपडेही रक्ताने माखले आहेत.

रमेश बाबुराव सूर्यवंशी (रा.ट्राफिक गार्डन, शाहूनगर) हे त्यांची पत्नी सुरेखा रमेश सूर्यवंशी आणि मुलगा महेंद्र सूर्यवंशी यांच्यासह शाहूनगरातील ट्राफिक गार्डन राहतात. महेंद्र सूर्यवंशी हा क्युआरटी विभागात पोलीस कर्मचारी असल्याने ते शाहूनगर पोलीस वसाहतीत राहतात. रमेश सूर्यवंशी यांना दारुचे व्यसन आहे. त्यामुळे त्यांचे मुलगा व पत्नी यांच्यात दारुमुळे वाद होतात. गेल्या आठ दिवसांपासून ते एकटे वेगळे राहत होते.

गुरुवार दि.२७ रोजी सकाळी १० वाजता त्यांनी रागाच्या भरात राजकमल टॉकीजच्या परिसरात ३० रुपयाचा घरगुती चाकू खरेदी केला. त्यानंतर त्यांनी गावठी दारू पिऊन शाहूनगरातील घर गाठले. त्यांची पत्नी व मुलगा घरातच होते. रमेश सूर्यवंशी दारुच्या नशेत घरातील दारात आले. त्यावेळी घरातील सर्व जण बेसावध होते. त्यांनी घरात अचानक येवून पत्नीवर चाकूने वार करुन गंभीर जखमी केले.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे भेदरलेल्या महिलेने आरडाओरड केला. त्यामुळे हा प्रकार मुलगा महेंद्रच्या लक्षात आला. त्याने आईला प्रारंभी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमीवर प्रथमोपचार करुन खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. महिलेच्या पोटावर, हातावर वार झाले आहेत. याबाबत कळताच जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अकबर पटेल व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. यासंदर्भात आरोपी रमेश सूर्यवंशी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!