Type to search

DT Crime Watch Featured जळगाव

जळगाव : वाघनगरातील तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

Share
jalgaon

जळगाव -प्रतिनिधी

रेल्वे स्थानकाबाहेर काही जणांच्या एका टोळक्याने चेतन संजय करोसिया (वय २५) रा.वाघनगर या तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.

चेतनवर धारदार शस्त्राचे तीन ठिकाणी वार करण्यात आले आहेत. चेतन हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. त्याच्या मुलाच्या जाऊळचा कार्यक्रमासाठी बाहेर गावाहून येणार्‍या पाहुण्यांना घेण्यासाठी तो दुपारी रेल्वे स्थानकावर गेला होता.

यावेळी काही तरुणांच्या टोळक्याने चेतनवर हल्ला चढविला. यात चेतनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. वाघनगर परिसरात शुक्रवारी एका लग्नात वाद झाले होते. हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न चेतनने केला होता. त्यानंतर त्यास सायंकाळी काही तरुणांनी ठार मारण्याची धमकी दिली. तर या वादातून त्या तरुणांनी थेट हल्ला केला, असे सांगण्यात येते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!