Friday, April 26, 2024
Homeजळगावजळगाव : जिल्हा रूग्णालयात कोरोना संशयिताचा मृत्यू

जळगाव : जिल्हा रूग्णालयात कोरोना संशयिताचा मृत्यू

जळगाव –
जिल्हा सामान्य रूग्णालयात काल दि.३० मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ५२ वर्षी इसमास कोरोना संशयीत म्हणून उपचारासाठी दाखल केले होते. त्याचा मेडीकल अहवाल अजून येणे बाकी असतानाच आज सकाळी मृत्यू झाल्याने शंकांना उधाण आले आहे. तरी नागरीकांनी घाबरून न जाता आपल्या कर्तव्याचे पालन करावे.

दि.३० मार्च रोजी दुपारी २ च्या सुमारास ५२ वर्षीस इसमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे कोरोना कक्षात संशयीत म्हणून दाखल केले होते. त्याचे नमूने तपासणीसाठी पाठविले असून अद्याप रिपोर्ट येणे बाकी आहे. रिपोर्ट आल्यानंतरच कळेल की त्याचा नेमका मृत्यू कशामुळे झाला त्यामुळे नागरीकांनी घाबरून न जाता गर्दीत जाणे टाळावे अशी माहिती डीन डॉ.भास्कर खैरे यांनी दिली.

- Advertisement -

काल दि.३० मार्च पर्यंत ७१ जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी ४१ रूग्णांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. दोन रिजेक्ट झाले तर उर्वरीत रिपोर्ट येणे बाकी आहे. महापालीकेच्या छत्रपती शाहु महाराज रूग्णालयात २४ संशयीतांना तीन वॉर्डात उपचार सुरू आहेत.

दोन दिवसांपूर्वी शहरातील एका इसमाचा कोरोना पॉझीटीव्ह आल्याने व आज एका संशयीताचा रिपोर्ट येण्याअगोदरच मृत्यू झाल्याने जिल्हावासियांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या