Thursday, April 25, 2024
Homeजळगावजळगाव : जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे नऊ संशयित रुग्ण दाखल ; ‘त्या’ दोन...

जळगाव : जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे नऊ संशयित रुग्ण दाखल ; ‘त्या’ दोन रूग्णांचे अहवाल येणे बाकी

जळगाव | प्रतिनिधी
जिल्हा रुग्णालयात रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत कोरोनाच्या संशयित नऊ रुग्णांना दाखल करण्यात आले. त्यांचे स्वॅप घेवून ते तपासणीसाठी धुळे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. तर या अगोदरचे आणि रविवारी दुपारपर्यंतच्या दाखल संशयित २२ रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

दोघं रुग्णांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
जिल्हा रुग्णालयातील दि.३ रोजी रात्री एक वाजता वाल्मीकनगरातील ३३ वर्षीय तरुण आणि दि.४ रोजी सायंकाळी खोटेनगरातील ६५ वर्षीय महिलेस कोरोनाचे संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले होते. त्यांचा मृत्यू शनिवारी रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास रुग्णालयात उपचार घेत असताना झाला. या दोघांची कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाशी कॉन्टॅक्ट व ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. त्यांच्या स्वॅपच्या नमुन्यांचा अहवालल अद्याप प्रतीक्षेत आहे, असे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.

- Advertisement -

खोटेनगरातील महिलेस डायबेटीस, ब्लडप्रेशर, दमा, निमोनिया आदी आजार होते. तर वाल्मीकनगरातील तरुणास ताप, खोकला, निमोनिया आणि श्‍वास घेण्यास अधिक त्रास व्हायचा. दोघांचे मृतदेह रविवारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. हे मृतदेह शासनाच्या धोरणानुसारच प्लास्टिकच्या विशिष्ट मोठ्या बँगमध्ये पॅकींग करण्यात आले. त्यांच्यावर शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच अंत्यसंस्कार करण्यात यावे, असे मृतांच्या नातेवाईकांना वैद्यकीय अधिकार्‍यांनी सूचना दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या