Type to search

Breaking News Featured जळगाव

जळगाव : मोटारसायकलला टँकरची धडक ; पती-पत्नी जागीच ठार

Share
jalgaon accident news

जळगाव

शहरातील पोद्दार इंग्लिश मेडियम समोर महामार्गावर आज दुपारी २ वाजेच्या सुमारास मोटरसायकलला टँकरने धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

फुले मार्केटमधील गोपाल जनरल स्टोअर्सचे मालक महेंद्र गोपालदास आहुजा (वय ४८) रा.गायत्री नगर शिरसोलीरोड, भावना महेंद्र आहुजा (वय ४५) हे दुकानाच्या कस्टमरच्या नातेवाईकाचे लग्न पाळधी येथे होते याठिकाणी जळगावकडून पाळधीकडे जात असताना मागून येणार टँकरने जोरधार धडक दिल्याने हे दाम्पत्य जागील ठार झाले.

हा अपघात महामार्गावरील खड्डे व खोल झालेल्या साईडपट्या यामुळेच झाला असल्याचे सांगितले जात आहे.

महेंद्र आहुजा यांच्या पश्चात चार भाऊ, चार बहीणी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!