Type to search

Featured

जळगाव : एरंडोलजवळील भीषण अपघातात ७ ठार : दहा जखमी

Share

एरंडोल (प्रतिनिधी) येथून जळगावच्या दिशेने अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या एका हॉटेल जवळ प्रवाशी वाहतूक करणारी कालीपिली आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात चालकासह ७ प्रवासी  ठार तर  १० प्रवासी जखमी  झाले आहेत.

या संदर्भात अधिक असे की, याबाबत माहिती अशी की, एरंडोल शहरापासून सहा किलोमीटर असलेल्या हॉटेल गौरीजवळ धुळेकडून जळगावकडे जाणार्‍या क्रमांक (एम एच १५ जी ८४७४) या गाडीचा एक्सेल तुटल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. यात जळगावकडून एरंडोलकडे जाणार्‍या कालीपिली गाडी क्रमांक (एमएच १९ वाय ५२०७) या गाडीवर आदळली. काली पिली गाडीतील सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांना एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!