Type to search

Featured धुळे

धुळे : वसतिगृह प्रसूती प्रकरणी अखेर पाच जणांवर गुन्हा दाखल

Share
Dhule

धुळे – प्रतिनिधी

साक्री येथील सावित्रीबाई फुले आदिवासी मुलींच्या निवासी वसतिगृहात प्रसूती प्रकरणी अखेर संशयित मुलासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल जरण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात पीडितांचे कुटुंबीय तक्रारीसाठी अजूनही पुढे आलेले नसून पोलीस कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद झाली आहे.

साक्रीतील या वसतिगृहा शेजारील एका शाळेच्या भिंती जवळ नवजात बालक फेकून दिल्यानंतर या बाळाची आई याच वसतिगृहातील विद्यार्थिनी असल्याचे उघड झाले. तेव्हापासून हे प्रकरण गाजते आहे.

प्रथमदर्शनी वसतिगृहाच्या गृहपाल अश्विनी वानखेडे याना निलंबित करण्यात आले आहे. मात्र या गंभीर प्रकरणी पीडित मुलीचे कुटुंबीय अजूनही पुढे न आल्याने तपासात आढळलेल्या काही बाबींच्या आधारे युवराज वेडू बागुल यांनी फिर्याद दिल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

यात संशयित मुलगा रवी रहेम्या पाडवी, गृहपाल अश्विनी पुंडलिक वानखेडे, शिपाई सुनंदा पांडुरंग परदेशी, मदातनिस्सापणा राजेंद्र धनगर, आणि वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!