Type to search

Breaking News धुळे

धुळे : शिरूड येथील सेंट्रल बँकेचे एटीएम मशीन गायब ; बारा लाख रुपये लांबविले

Share
Dhule Shirul ATM

नूतन पोलीस अधीक्षकांना चोरट्यांची सलामी

धुळे (प्रतिनिधी –

नूतन पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना चोरट्यांनी सलामी दिली आहे. तालुक्यातील शिरुड गावातील सेंट्रल बँकेचे एटीएम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज पहाटे घडली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

दरम्यान एटीएम मध्ये सुमारे 14 लाखांची रोकड असल्याची माहिती समोर येत आहे. शिरुड गावात गाव दरवाज्यासमोरच सेंटल बँकेचे एटीएम मशिन आहे.

आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास पिकअप वाहनाने आलेल्या चार ते पाच चोरट्यांनी एटीएम मशिन जमिनीपासून
उखडून चोरून नेले. मशीन बाहेर नेताना एटीएमचा काच देखील फोडला.

पहाटे ही घटना उघडकीस आली. त्यानंतर ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळतात पोलीस अधीक्षक
चिन्मय पंडीत, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर फॉरेन्सिक लॅबचे पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले असून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!