Type to search

धुळे : ४८ लाखांचा मद्यसाठा जप्त ; शिरपूर पोलिसांची कारवाई

Share
Police

आयशर चालकासह तिघांना अटक

धुळे – प्रतिनिधी

हरियाणा राज्यातून गुजरातमध्ये जाणारा विदेशी मद्याचा मोठा साठा शिरपूर पोलिसांनी पकडला आहे. यात दहा लाखाच्या आयशर सह 48 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक करण्यात आली आहे.

हरियाणा राज्यातून मद्यसाठा घेऊन आयशर ( UP 21 BN 3473) चोपडा फाट्यातून शहादा मार्गे गुजरात राज्यात जात असल्याची माहिती शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यांनी लगेच लाहचाली करून हे वाहन अडविले.

त्यात 800 खोके मद्यसाठा आढळून आला, प्रत्येक खोक्यात प्रत्येकी 180 मिलीचे 48 नग होते. या मद्याची किंमत 38 लाख 40 हजार इतकी आहे तर 10 लाखांचा आयशर असा 48 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

तसेच आयशर चालक मोहम्मद शरीफ अली मोहम्मद (२२, रा. हरियाणा), इस्माईल शहाबुद्दीन खान (18, रा.हरियाणा) आणि विनोद पुंडलिक जाधव (26, रा. राणी मोहिदा, पानसेमल, म. प्र.) या ईघाना अटक केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!