Type to search

Breaking News Featured जळगाव

धुळे : 12 दिवसापासून नळांना पाणी नाही ; नगरसेवकांनी केले जलकुंभावर चढून आंदोलन

Share
Dhule

धुळे

शहरातील देवपूर परिसरात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून नळांना पाणी न आल्याने संतप्त झालेल्या एम.आय.एम.च्या तीनही नगरसेवकांनी जलकुंभावर चढून शोले स्टाइल आंदोलन केले.

मनपाचे शहर अभियंता कैलास शिंदे यांनी घटनास्थळी येऊन समजून घालून आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
शहरातील देवपूर प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिक आल्यापासून पिण्याच्या पाणी समस्सेचा सामना करीत आहेत.

अजून प्रत्यक्षात उन्हाळा सुरू झाला नसला तरी 8 ते 10 दिवसांपासून पाणी न येणे हे नेहमीचेच बनले आहे. आता तर गेल्या 12 दिवसांपासून पाणी आलेले नाही. त्यामुळे हेआंदोलन करण्यात आले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!