Type to search

Breaking News Featured धुळे

धुळे : पैशाच्या वादातून एकाला जाळले ; सोनगीर गावात तणाव, तिघे ताब्यात

Share
जमीन लाटण्यासाठी बेलवंडीत मृत विश्वस्त केले जिवंत. Latest News Land Froud Shrigonda

धुळे | प्रतिनिधी

तालुक्यातील सोनगीर येथे उसनवार पैशांच्या वादातून एकाला मारहाण करत त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याची घटना घडली आहे.

उपचारादरम्यान जखमी झालेल्या नंदकिशोर आधार पाटील (४१, रा़ चिंचगल्ली, सोनगीर) यांचा शनिवारी मृत्यू झाला. घटनेमुळे सोनगीर गावात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी तिघा संशयीतांन ताब्यात घेतले आहे. दोंडाईचा रोडवरील बसस्थानकाजवळ दि.१७ जानेवारी रोजी सायंकाळी नंदकिशोर पाटील यांना उसनवारीच्या पैशाच्या वादातून घनश्याम नाना गुजर, मंगेश गुजर आणि मख्खन गुजर (रा़ सोनगीर) अशा तिघांनी मारहाण केली.

तसेच त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. जखमी अवस्थेत त्यांना हिरे वैद्यकिय  महाविद्यालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतांना आज पहाटे नंदू पाटील यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी १८ रोजी नंदकिशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान घटनेमुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़ मयत तरुणाच्या नातलगांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्यामुळे वातावरण तणावपुर्ण झाले होते़ पोलिसांनी संशयित तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!