Type to search

Breaking News धुळे

धुळे : सीएए, एनआरसीविरोधात मोर्चाला हिंसक वळण ; वाहनांची जाळपोळ

Share

धुळे –

विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) व ईव्हीएमविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला हिंसक वळण लागले.

बंदला हिंसक वळण लागत डीवायएसपी सचिन हिरेंचे वाहन फोडण्यात आले तर एसपी पांढरेंच्या वाहनालाही घेराव घालण्यात आला. शिवाय, आंदोलकांनी धुळे शहर, शिरपूर शहरात दोन एसटी बसेस, एक रिक्षा फोडण्यात आल्यात. विविध भागात जाळपोळही करण्यात आली.

तसेच साक्री रोडवर टायर जाळून तर चाळीसगाव रोडवर मुरुममाती टाकून रस्ता अडविण्यात आला. यामुळे धुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. जमाव रस्त्यावर उतरल्याने अनेक भागात संचारबंदी सदृष्य परिस्थिती होती. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज तसेच अश्रुधूराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्यात.

विविध भागात हा जमाव जमत असल्याने पोलिसांची धावपळ होत होती. आंदोलकांनी महार्गावर येत वाहनांवर दगडफेकीचे प्रकारही केलेत. यामुळे महामार्गावरील वाहतूकही थांबली होती. एकंदरीत धुळे शहरातील मुस्लिम बहूल भागातच जमाव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे चित्र होते. परंतू, धुळे शहरातील मुख्यबाजार पेठेत आणि मध्यवर्ती भागात आणि देवपूरात सर्वच व्यवहार सुरळीतपणे सुरु होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!