Type to search

Featured जळगाव

जळगाव : जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल, खाजगी क्लासेस, अभ्यिासिका ३१ मार्च पर्यंत बंद

Share
Jalgaon

आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई

जळगाव

शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८१७ नुसार दि.१३ मार्च पासून लागू केलेल्या तरतुदीनुसार या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल (अत्यावश्यक किराणा सामान, दुध, भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू) वगळून सर्व खाजगी क्लासेस, ट्युशन्स, अभ्यासिका दि.३१ मार्च पर्यंत (पुढील आदेश होईपर्यंत) बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न केले जात असून दि.१६ पासून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयेही ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश याआधीच देण्यात आले आहेत.

शाळा, महाविद्यालये, क्लासेस यांना सुट्या देण्यात आल्या असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना कोठेही गर्दीच्या ठिकाणी जावू न देता सुरक्षीतता बाळगावी जेणेकरून या आजारापासून आपण प्रत्येकजण बचाव करू शकतो.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!