Type to search

Featured जळगाव राजकीय

चोपडा पं.स.सभापतीपदी राष्ट्रवादीच्या कल्पना पाटील तर उपसभापतीपदी भाजपचे भूषण भिल बिनविरोध

Share

चोपडा (प्रतिनिधी) –

चोपडा पंचायत समितीच्या सभापती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पना यशवंत पाटील तर भाजपचे भूषण मधुकर भिल यांची आज दि.२ रोजी दुपारी  २ वाजता बिनविरोध निवड करण्यात आली.

निवड सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अनिल गावित होते. सभापती पदासाठी कल्पना  यशवंत पाटील व उपसभापती पदासाठी भूषण मधुकर भिल या दोघांचा प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली.

सभापती पदासाठी कल्पना यशवंत पाटील यांना सूचक म्हणून अमिनाबी रज्जाक तडवी होत्या तर उपसभापती पदासाठी भूषण मधुकर भिल यांना सूचक म्हणून विद्यमान सभापती आत्माराम गोरख म्हाळके होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!