Type to search

Featured जळगाव

चाळीसगाव : मेहुणबारे येथे शिक्षकाच्या घरात धाडसी चोरी; दिड लाखांचा ऐवज लांबविला

Share
chalisgaon robbery news

चाळीसगाव | प्रतिनिधी

मेहूणबारे येथे शुक्रवारी पहाटे आश्रमशाळेतील शिक्षकाचे बंद घराचे कडी कुलूप तोडून घरातील तीन लोखंडी कपाटातील सुमारे १ लाख ४० हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिन व रोख रक्कम १० हजार रूपये असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

मेहूणबारे येथील आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक शिरीष शिवाजी बाविस्कर हे येथील धुळे – जामदा रस्त्याला लागून असलेल्या घरात कुटुंबासह राहतात. ते आपल्या मूळ गावी पाथरी ता. जळगाव येथे गावाच्या यात्रेनिमीत्त कुटुंबासह दि.२५ रोजी गेलेले होते. गावी गेले असल्याने घर कुलुपबंद होते.

आज दि.२७ रोजी पहाटे या घराच्या आसपासच्या नागरीकांना बाविस्कर यांच्या घराच्या दरवाजाच्या कडी कोंडा तुटलेल्या अवस्थेत दिसला. रहिवाशांनी ही बाब शिक्षक शिरीष बाविस्कर यांना कळविली.

तसेच मेहूणबारे पोलीसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री केव्हातरी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप व कडी कोंडा तोडून आत प्रवेश करून घरात असलेल्या तीन लोखंडी कपाटातील सामान जमिनीवर फेकून कपाटातील सुमारे १ लाख ४० हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिणे व रोख १० हजार रूपये असा सुमारे १ लाख ५० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचा बाविस्कर यांचा अंदाज आहे.

चोरीची माहिती मिळताच सकाळी १० वाजता मेहूणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली.

हवालदार जालमसिंग पाटील व योगेश मांडोळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तपासासाठी जळगावहून फिंगर प्रिंट व श्वान पथकास पाचारण करण्यात आली आहे.

याप्रकरणी शिरीष बाविस्कर यांनी मेहूणबारे पोलीसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!