Type to search

Featured जळगाव

चाळीसगाव येथे लखपती भिकर्‍याचा मृत्यू ; पोलीस वारसदारांच्या शोधात

Share
chalisgaon rich beggar

चाळीसगाव | प्रतिनिधी

माणूस कर्म कुठलेही करत असो, परंतू तो आपल्या शिल्लकीचा मोह काही सोडत नाही, अनेक श्रीमंत लोकांच्या नावावर मृत्यूनतंर करोडो-अबजो रुपयांची जमा-पुजी निघते.

चाळीसगावतही काहीसा असाच प्रकार समोर आला आहे, परंतू तो श्रीमंत माणसाचा नव्हे, तर ‘श्रीमंत भिकार्‍याचा’. रेल्वेत आयुष्यभर झाडु मारुन भिक मागणार्‍याच्या नावावर बॅकेत चक्क बारा लाखांची शिल्लक निघाली.

भिकार्‍याच्या नावावर बॅकेत बारा लाखांची रक्कम पाहुन पोलीस देखील आवाक झाले आहेत. चाळीसगाव येथील नारायण वाडी परिसरातील इंदरसिंग फुलचंद ठाकूर हा ५२ वर्षीय इसम रेल्वेत झाडू मारुन, साफ सफाई करुन प्रवाश्यांजवळ भीक मागून उदरनिर्वाह करायचा.

तो गेल्या काही दिवसांपूर्वी आजारी पडल्याने, त्याला अत्यवस्थ अवस्थेत धुळे येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्याचे निधन झाले. पोलिसांनी त्याच्या जवळील सामानाची तपासणी केली असता, त्यात स्टेट बँकेचे पासबुक आढळून आले.

या पासबूकमध्ये त्याच्या खात्यावर चक्क बारा लाख रुपयांची रक्कम आढळून आली. त्यामुळे पोलीस देखील आवक झाले. आता त्यांच्या मृत्यूनतंर बारा लाखांच्या वारसासाठी पोलीस त्यांच्या नातेवाईकांची शोध घेत आहेत. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!