Type to search

Breaking News Featured जळगाव

भुसावळ : लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी विशेष पार्सल एक्सप्रेस

Share
Bhusawal

भुसावळ

कोरोनच्या दुष्प्रभावामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आला आहे. अशा काळात जीवनावश्यक साधन सामुग्रीची वाहतुक करण्यासाठी विशेष पार्सल एक्सप्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या लोकाना काही सामुग्री पाठवयाची असेल त्यांनी आपल्या जवळपासच्या स्टेशन मुख्य पार्सल पर्यवेक्षकांशी संपर्क करावी तसेच मागणीनुसार गाडीची फेरी वाढविण्यात येणार आहे.

कांकरिया संकरैल माल टर्मिनल दरम्यान विशेष पार्सल गाडी- ही गाडी दि. ३१ मार्च रोजी रात्री २३.४५ वाजत कांकरिया येथून रवाना होऊन तिसर्‍या दिवशी रात्री ८ वाजता संकरैल माल टर्मिनल पोहचेल.ही गाडी दि. ४ एप्रिल रोजी संकरैल माल टर्मिनल येथून रात्री १०.३० वाजता रवाना होऊन तिसर्‍या दिवशी कांकरिया येथे सायंकाळी ६.१५ वाजता पोहचेल. ही डाऊन गाडी आनंद, वरोदरा, सूरत,जळगाव, भुसावळ, नागपुर, गोंदिया, दुर्ग, रायपुर, बिलासपुर, झारसुगडा, टाटानगर, खरगपुर या ठिकाणी थांबेल.

करमबेली, चांगसारी, दरम्यान विशेष पार्सल गाडी
ही गाडी दि.२ एप्रिल रोजी रात्री ६ वाजता रवाना होऊन तीसर्‍या दिवशी पहाटे ५ वाजता चांगसारी पोहचेल. ही गाडी दि. ६ एप्रिल रोजी चांगसारी येथून दुपारी १२ वाजता रवाना होऊन तीसर्‍या दिवशी रात्री ९.३० वाजता करमबेली पोहचेल. ही गाडी वलसाड, उधना, जळगाव, अकोला, नागपुर, दुर्ग, रायपुर, बिलासपुर, झारसुगडा, टाटानगर, संकरैल माल टर्मिनल, भट्टा नगर, दनिकुनी, मालदा टाउन, न्यू बोंगाईगांव या स्थानकांवर थांबेल.
कल्याण ते संकरैल माल टर्मिनल विशेष पार्सल गाडी- गाडी क्र ००१०१ डाउन दि. २ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता कल्याण येथून रवाना होऊन तिसर्‍या दिवशी दुपारी १२ वाजता संकरैल माल टर्मिनल पोहचेल. डाऊन ००१०२ अप संकरैल माल टर्मिनल – कल्याण ही गाडी दि. ६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता संकरैल माल टर्मिनल येथून रवाना होऊन तिसर्‍या दिवशी सायंकाळी ६ वाजता कल्याण पोहचेल.

ही गाडी इगतपुरी , नासिक , मनमाड, जळगाव, भुसावळ, बडनेरा, नागपुर, दुर्ग, बिलासपुर, झारसुगडा, राउलकेला, टाटानगर थांबेल.
कल्याण ते न्यू गुवाहाटी स्टेशन विशेष पार्सल गाडी- ००१०३ डाउन कल्याण न्यू गुवाहाटी ही गाडी दि.७ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता कल्याणहुन रवाना होऊन तीसर्‍या दिवशी सकाळी १० वाजता न्यू गुवाहाटी स्टेशन पोहचेल.

गाडी क्र.००१०४ अप न्यू गुवाहाटी स्टेशन-कल्याण ही गाडी दि.१० एप्रिल रोजी न्यू गोवाहाटी स्टेशनहुन रात्री ११.३० वाजता रवाना होऊन १३ एप्रिल रोजी सायं ६ वाजता कल्याण पोहचेल. ही गाडी इगतपुरी, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, बडनेरा, नागपुर, दुर्ग, बिलासपुर, झारसुगडा, राउलकेला, टाटानगर, संकरैल माल टर्मिनल, भट्टा नगर, दनिकुनी, मालदा टाउन, न्यू बोंगाईगांव या ठिकाणी थांबेल.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!