Type to search

Breaking News Featured जळगाव

भुसावळ : दुग्ध व्यावसायिकाचा डोक्यात रॉड राकून खून

Share
mardur

भुसावळ – प्रतिनिधी
येथे दिवसाढवळ्या दुग्धव्यावसायिकाचा डोक्यात रॉड राकून खून केल्याची घटना आज दि.२ रोजी येथील कोळी वाड्यात घडली. नशीर बशीर पटेल (वय ३५, रा. साकेगाव) असे या खून झालेल्या इसमाचे नाव असून ही घटना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.

भर दिवसा घडलेल्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच डिवायएसपी गजानन राठोड, पो.नि. दिलीप भागवत, शहरचे संजय चौधरी, वाहतुक शाखेचे एपीआय के.टी.सुरळकार, तुषार पाटील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

झालेला खून हा अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाल्याचे बोलले जात आहे. तसेच संशयीत धिरज गणेश शिंदे (वय २१) रा. कोळी वाडा याने हा खून केल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी बघ्यांनीही गर्दी केली होती. शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!