Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी सौंदाळा ग्रामस्थांनी ठोकले शाळेला टाळे

Share

भेंडा | (वार्ताहर)

नेवासा तालुक्यातील सौंदाळा जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक पंडित यांची बदली झालेली बदली रद्द करावी या मागणीसाठी आज सौंदाळा ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले आहे.

याबाबद अधिक माहिती अशी की, सौंदाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक,आदर्श शिक्षक अशोक पंडित यांनी नुकतीच सौंदाळा शाळेतून भेंडा खुर्द येथे बदली झाली आहे.

श्री. पंडित यांचे मुळे सौंदाळा शाळेचा कायापालट होऊन शैक्षणिक गुणवत्ता सुधारलेली आहे. अशा गुणवंत शिक्षकाच्या बदलीला सौंदाळा ग्रामस्थांचा विरोध आहे. बदली रद्द करावी यासाठी प्रयत्न करूनही ती रद्द न झाल्याने शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी सौंदाळा ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

कॉ. शरद आरगडे, सचिन आरगडे, सुनील आरगडे, विजय गोरे, बाळासाहेब बोधक, बबन आरगडे, रेवण आरगडे, राजू चामुटे, मधुकर आरगडे, विजय मुरकुटे, कानिफनाथ आरगडे, प्रवीण आरगडे, बाबासाहेब आरगडे, मारुती आरगडे, भागचंद चामुटे आदींनी शाळेला कुलूप ठोकले आहे.

बदली रद्द होई पर्यंत कुलूप…

शिक्षक श्री पंडित यांची बदली रद्द होई पर्यंत शाळेला कुलूप लावून शाळा बंद ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

शिक्षण विभागाची तारांबळ…

सौंदाळा ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकल्यामुळे नेवासा पंचायत समिती शिक्षण विभागाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. गटशिक्षण अधिकारी विलास साठे हे सौंदाळा जिल्हा परिषद शाळेत दाखल झाले असून ते ग्रामस्थ व पालकांचे मन वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप कोणताही तोडगा निझालेला नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!