LOADING

Type to search

एसटीचे चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई आता होणार लिपिक

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

एसटीचे चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई आता होणार लिपिक

Share

मुंबईदि. 6 : एसटी महामंडळातील चालकवाहकसहाय्यकशिपाई व तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांना आता लिपिक – टंकलेखक पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी लिपिक – टंकलेखक संवर्गामध्ये २५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे केली.

चालकवाहकसहाय्यकशिपाईनाईकहवालदारउद्वाहन चालकमजदूरपरिचरखानसामाअतिथ्यालय परिचरसफाईगारसुरक्षा रक्षकखलाशीसहाय्यक माळीमाळी व स्वच्छक या पदावरील कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

राज्यात या पदावर सुमारे १ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी विहीत शैक्षणिक अर्हता पूर्ण करणारे कर्मचारी लिपिक – टंकलेखक पदासाठी पात्र ठरतील. अशा कर्मचाऱ्यांसाठी आता महामंडळातील लिपिक – टंकलेखक संवर्गामधील २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

या निर्णयामुळे महामंडळातील ज्या कर्मचाऱ्यांनी लिपिक – टंकलेखक पदासाठी आवश्यक शिक्षण घेतले आहे त्यांचे शिक्षण वाया न जाता आता त्यांना महामंडळातच पदोन्नतीची संधी मिळेलअसे मंत्री श्री. रावते यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!