Breaking News : काकासाहेबनगरला गँस सिलिंडरचा स्फोट ; 40 झोपड्या बेचिराख

0

काकासाहेब नगर (रानवड) : काकासाहेबनगरला शाँटसर्कीटने 40 झोपड्या बेचिराख झाल्या असून आग विझवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होत आहे.

क का वाघ महाविद्यालय इमारतीचे कामकाज सुरू असल्याने येथे मजूर वर्ग झोपड्यां मध्ये राहत होता. शाँटसर्कीटने ही आग लागल्याची चर्चा असून एका झोपडीतील गँस सिलिंडर टाकीचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे एक-एक करत ४० झोपड्या बेचिराख झाल्या.

अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. पिंपळगाव ब पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

LEAVE A REPLY

*