नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू ; मृत्यूचे कारण अस्पष्ट

jalgaon-digital
1 Min Read

नंदुरबार | प्रतिनिधी

येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या लांबोळा (ता.शहादा) येथील एका ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे हा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत माहिती उपलब्ध नाही.

लांबोळा ता.शहादा येथील एक ६२ वर्षीय महिला दोन दिवसांपुर्वी खाजगी रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आली होती. तिची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे तिच्या स्वॅबचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

परंतू तिचा उपचार सुरु असतांनाच तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, जिल्हयात आतापर्यंत एकुण ८९० रुग्णांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

त्यापैकी ७०५ अहवाल निगेटीव्ह आले असून २१ पॉझिटीव्ह आले आहेत. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून ९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १६० रुग्णांचे कोरोना अहवाल प्रलंबित आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *