Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार : जिल्हा वासीयांच्या आनंदावर विरजण ; रजाळे येथे एक करोना पॉझिटीव्ह...

नंदुरबार : जिल्हा वासीयांच्या आनंदावर विरजण ; रजाळे येथे एक करोना पॉझिटीव्ह आढळला

संपर्कातील पाच जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले, ९ जण क्वॉरंटाईन

नंदुरबार | प्रतिनिधी

- Advertisement -

नंदुरबार जिल्हयातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त होवून दोन दिवस होत नाही तोच रजाळे (ता.नंदुरबार) येथे ६६ वर्षीय पुरुष कोरोनाबाधीत आढळून आला आहे.

या रुग्णाच्या संपर्कातील ५ व्यक्तींचे स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आले असून दुय्यम  संपर्कातील ९ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या आनंदावर विरजण पडले आहे.

जिल्ह्यात गेल्या महिनाभरात २१ जण कोरोनाबाधीत आढळून आले होते. यापैकी दोघांचा मृत्यू झाला होता. तर १९ जणांवर उपचार सुरू होते. उपचार सुरु असलेले सर्व रुग्ण कोरोनामुक्त होवून त्यांना जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते.

दि.१७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता कोरोनाचे शेवटच्या दोन रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने नंदुरबार जिल्हयातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. दरम्यान, तालुक्यातील रजाळे येथील एका ६६ वर्षीय इसमाचा कोरोना अहवाल काल रात्री पॉझिटीव्ह आला आहे.

सदर व्यक्ती मुंबई येथे आपल्या मुलीकडे एक महिना राहून आल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या व्यक्तीच्या संपर्कातील ५ व्यक्तींचे स्वॅबचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच दुय्यम संपर्कातील अन्य ९ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

गावात जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली असून नागरिकांनी सतर्क राहून कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्हयातील २१ पैकी २ रुग्णांचा मृत्यू झाला असून १९ रुग्णांनी कोरोनावर मात केली होती.

त्यामुळे नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. परंतू हा आनंद अल्प काळ टिकला. जिल्हा कोरोनामुक्त होवून दोन दिवस झाले तोच रजाळे येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने जिल्हावासीयांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या