Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारशहादा येथील एक रुग्ण करोनामुक्त ; जिल्ह्यात आता फक्त  तीन रुग्ण

शहादा येथील एक रुग्ण करोनामुक्त ; जिल्ह्यात आता फक्त  तीन रुग्ण

नंदुरबार | प्रतिनिधी

शहादा येथील 65 वर्ष वयाच्या पुरुष रुग्णांचा शेवटचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला आज जिल्हा रुग्णालायातुन मुक्त करण्यात आले.

- Advertisement -

त्यामूळे आता जिल्ह्यात कोरोना रुग्ण केवळ तीन राहिले आहेत. इतर 24 व्यक्तींचे अहवालदेखील निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात गेल्या महिनाभरात 21 जण कोरोनाबाधीत आढळून आले होते. यापैकी दोघांचा मृत्यू झाला होता. तर १९ जणांवर उपचार सुरू होते.

याआधी पाच व त्यानंतर चार जण असे नऊ रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यामुळे उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 9 होती. यातील आणखी 6 रुग्ण काल दि. 15 रोजी कोरोनामुक्त झाले.

त्यांना काल सायंकाळी जिल्हा रूग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान आज शहादा येथील एका 65 वर्षीय रुग्णाचा शेवटचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १6 झाली आहे. सद्य:स्थितीत आता जिल्हा रूग्णालयात 3 जणांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या