Saturday, April 27, 2024
Homeजळगावरावेर : मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून एक लाख ३६ हजार दंड वसुल

रावेर : मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून एक लाख ३६ हजार दंड वसुल

साडेचार लाख रुपये पीएम/सीएम फंडात जमा

रावेर | प्रतिनिधी-

- Advertisement -

करोना संकटात देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळून पडल्याने,या लढ्यात रावेर तालुक्यातील उदार दातृत्व कडून पीएम व सीएम फंडात तब्बल साडे चार लाखची मदत जमा झाली आहे.

करोनामुळे केळी उत्पादक,शेतकरी,मजूर मोठ्या संकटातून जात आहे.तरीही देशावर आलेल्या संकटातून मुकाबला करण्यासाठी रावेर तालुक्यातून पंतप्रधान सहाय्यता निधीत १ लाख ७० हजार ६०० व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २ लाख ७१ हजार रुपये मदत देण्यात आली आहे.

तसेच या दरम्यान मास्क वापरणे बंधनकारक असूनही नागरिक या नियमाचे पालन करत नसल्याने महसूल प्रशासना कडून झालेल्या कारवाईत ५९ हजार ७००,सावदा नगरपालिका ४१ हजार ५००,रावेर पालिका ८ हजार ९००,रावेर पोलीस स्टेशन २० हजार ४००,निंभोरा पोलीस ५ हजार ६०० असे एकूण १ लाख ३६ हजार रुपये दंड वसुली करण्यात आल्याची माहिती तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या कडून मिळाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या