Friday, April 26, 2024
Homeजळगावजळगाव : सहा वाइन शॉप तपासणीच्या भोवर्‍यात

जळगाव : सहा वाइन शॉप तपासणीच्या भोवर्‍यात

जळगाव | प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्‍वभूमीवरील लॉकडाऊनच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जळगाव आणि नाशिक विभागाच्या पथकातर्फे जळगाव शहर व परिसरातील विविध ठिकाणच्या सहा वाइन शॉपमधील मद्यसाठ्याची तपासणी शनिवारी सकाळपासूनच सुरू आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी मेहरुणमधील रामेश्‍वर कॉलनीतील राज वाइनच्या गोदामात तपासणी झाली होती. त्यानंतर या तपासणी सत्राला वेग आला आहे. ही तपासणी शनिवारी सकाळी सोनी ट्रेडर्स, नशिराबाद, विनोद वाइन, नीलम वाइन्स, विजय वाइन्स, एन.एन.वाइन्स या सहा ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी सुरू आहे.

मद्यसाठ्यात तफावत आढळल्यास कडक कारवाईचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे देण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरातील सील असलेल्या वाइन शॉप्समधील मद्यसाठ्याची तपासणी करावी. मद्यसाठ्यात तफावत आढळल्यास कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेमाडे, ॲड.कुणाल पवार यांनी राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या