Sunday, May 5, 2024
Homeजळगावरावेर : विजया बँकेच्या दरोडेखोरांची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस

रावेर : विजया बँकेच्या दरोडेखोरांची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस

रावेर | प्रतिनिधी

गेल्यावर्षी जूनमध्ये निंबोल (ता.रावेर) येथील विजया बँकेवर पडलेल्या दरोड्यांतील आरोपी अजूनही मोकाट फिरत असून, आरोपीची माहिती देणाऱ्यास लाखाचे बक्षीस पोलीस विभागाने घोषित केले आहे.

- Advertisement -

येथील बँकेत दोन हेल्मेटधारी दरोडेखोरांनी बँक लुटण्यासाठी प्रवेश केल्यावर त्यांना रोखणाऱ्या सहा.व्यवस्थापक करणसिंग नेगीवर गोळीबार करून जीवे ठार केल्याने, याघटनेच्या तपासाकरिता विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजे पासून, पोलिसांच्या विविध शाखानी काम केले आहे.

मात्र वर्ष उलटूनही अद्यापही आरोपी गवसण्यात पोलिसांना यश न आल्याने, पोलिसांनी आरोपीचे स्केच तयार करून, आरोपीची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या