Saturday, April 27, 2024
Homeजळगावनिंभोरा : व्हॉटसॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने गुन्हा दाखल

निंभोरा : व्हॉटसॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने गुन्हा दाखल

निंभोरा बु।। ता.रावेर – वार्ताहर

येथील एका मोबाईल वाटसॅप ग्रुपवर एकाने मोबाईल द्वारे धर्मा धर्मा मध्ये शत्रुत्व व द्वेष भावना निर्माण होईल अशा प्रकारचे पोस्ट व फोटो दि.५ रोजी प्रसारित केल्याने त्याचा विरुद्ध निंभोरा पोलिस ठाण्यात पो.हे.कॉ.राकेश वराडे यांनी फिर्याद दिल्याने भाग ६ गु र न् ०९/२०२० भादवी कलम ५०५ (२) प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.

- Advertisement -

सदर गुन्ह्याचा तपास फैजपुर पोलिस उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे, निंभोरा पोलिस ठाण्याचे सपोनि महेश जानकर यांच्या मार्गदर्शन खाली पोहे कॉ विकास कोल्हे, बाळू पाटील, राकेश वराडे, स्वप्निल पाटील, पो.कॉ.सुनील वंजारी, संदीप पाटील यांच्या पथकाने सदर आरोपी ताब्यात घेतले आहे. तपास सहाय्यक फौजदार राकेश पाटील करीत आहे.

जनतेने कोणतेही आक्षेपार्ह फ़ोटो व मेसेज पाठवू नये-सपोनि महेश जानकर
सर्व जनतेने आपल्या मोबाईल वरुण कोरोना या साथिच्या रोगच्या अनुषंगाने आक्षेपार्ह मेसेज, फ़ोटो तसेच कुठल्याही जाती धर्मा मध्ये शत्रुत्व व द्वेष भावनाचे निर्माण होईल अशा आशायाचे मेसेज व फ़ोटो प्रसारित करू नये तसे केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन सपोनी महेश जानकर यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या