जळगाव : रेशन दुकानावर धान्य घेण्यासाठी झुंबड ; सोशल डिस्टंगसिंगचा फज्जा

jalgaon-digital
1 Min Read

जळगाव –
कोरोना संकटामुळे लॉकडाऊन झोल्या जनतेला दिलासा देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य रेशनदुकानावर मोफत उपलब्ध करून दिले आहे, ते घेण्यासाठी रेशन दुकानांवर तोबा गर्दी होत असून ‘कोरोनाचे आम्हाला भय नाही’ असे समजून सोशल डिस्टंगसिंग न पाळता फक्त मोफत धान्याचा लाभ घेण्यासाठी स्वस्त धान्य दुकानावर एक झुंबड उडत आहे. असाच काहीसा प्रकार आज जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर येथे दिसून आला.

या प्रकारामुळे ‘कोरोना’ टाळण्याऐवजी आपण या गर्दीमुळे आणखीनच भर पाडत आहोत हे प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे. गरीब आणि गरजू लोकांना लॉकडाऊनमध्ये अन्न धान्याचा तुटवडा भासू नये म्हणून रेशन दुकानावर तीन महिन्याचे रेशन दिले जात आहे.

अन्न धान्याशिवाय उपासमारीची वेळ कुणावरही येवू नये या उद्देशाने राज्य सरकारने मोफत अन्न धान्य वाटप सुरू केले आहे. यास प्रत्येक नागरीकाने आपली जबाबदारी म्हणून ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग टालण्यासाठी व त्यास हाकलून लावण्यासाठी प्रत्येकाने ‘सोशल डिस्टंगसिंग’ पाळणे गरजेचे आहे.

हरिविठ्ठल नगरातील एका रेशन दुकानावर झालेली ही गर्दी बघून शासन मोफत धान्य वाटपाचा निर्णय तर बदलणार नाही ना? अशी भीती आता गरजू व गरीब कुटूंबांना ज्यांना अद्याप धान्य मिळालेले नाही अशा नागरीकांना वाटू लागली आहे. त्यामुळे याप्रकारची होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *