Thursday, April 25, 2024
Homeजळगावजळगाव : नशिराबाद येथे करोना बाधित व्यक्तिचा मृत्यू ; ग्रामीण भागात झाला...

जळगाव : नशिराबाद येथे करोना बाधित व्यक्तिचा मृत्यू ; ग्रामीण भागात झाला शिरकाव

घाबरू नका, खबरदारी घ्या नियमांचे पालन करा

नशिराबाद –
जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या दिवसागणीक वाढत आहे. जिल्हा रेडझोनमध्ये असला तरी सर्वत्र सर्वकाही अलबेल दिसत आहे. काल दि.२३ मे रोजी एकाच दिवशी सर्वाधिक ४७ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यातच शनिवारी रात्री नशिराबाद येथील संशयीत म्हणून दाखल असलेला ६५ ते ७० वयोगटातील एका पुरूष व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचा करोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असल्याने अखेर नशिराबादमध्येही करोनाने शिरकाव केला आहे.

आरोग्य यंत्रणेसह ग्रामपंचायत लागली कामाला
येथील करोना बाधीत व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच तालुका वैद्यकीय अधिकारी संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पीएससी सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन अग्निहोत्री यांनी स्वत:सह आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत प्रत्यक्षस्थळी व गावात खबरदारी म्हणून कार्यवाही करण्यास सुरूवात केली. बाधित रूग्णाच्या घराचा परिसर सिल केला. श्री.चव्हाण यांनी सुध्दा याठिकाणी भेट देवून पाहणी केली व सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्यात.

- Advertisement -

ग्रामपंचायतीने केली निर्जंतुकीकरण फवारणी
तर ग्रामपंचायतीनेही तत्काळ संपूर्ण परिसर सिल करून ट्रॅक्टरच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण फवारणी सुरू केली. यावेळी सरपंच विकास पाटील, उपसरपंच किर्तीकांत चौबे यांचेसह ग्रा.पं.पदाधिकारी, कर्मचारी तसेच जि.प.चे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी स्वत: हजर राहून जनतेला सहकार्य करण्याचे व खबरदारी घेण्याचे आवाहन केले.

सदर मयत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना क्वॉरंटाईन करण्याचे काम सुरू असल्याची माहिती नशिराबाद पीएससी सेंटरचे डॉ.चेतन अग्निहोत्री यांनी दिली. पोलिस प्रशासनातर्फे नशिराबाद पोलीस ठाण्याचे सपोनी प्रविण साळुंखे व त्यांचे सहकारी लक्ष ठेवून आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या