Friday, April 26, 2024
Homeजळगावजळगाव : डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जनरल हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून...

जळगाव : डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जनरल हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित

जळगाव –
गोदावरी फाऊंडेशन संचलीत डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल हे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात येऊन अधिग्रहीत करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात कोव्हिड-१९ बाधित, संशयित रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वी अधिग्रहित करण्यात आलेल्या खाजगी रूग्णालयांमधील बेडची संख्या देखील अपुरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग व कोव्हिड-१९ विषाणूमुळे बाधित, संशयीत व्यक्तींच्या उपचारासाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून ‘गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेज व जनरल हॉस्पीटल’ हे हॉस्पिटल सर्व मेडीकल, पॅरामेडीकल स्टाफ, सर्व उपलब्ध वैद्यकीय सोयीसुविधा व यंत्रणेसह अत्यावश्यक बाब म्हणून अधिग्रहीत केले आहे.

या हॉस्पीटलमध्ये येथील रूग्णांवर होणार उपचार
गोदावरी हॉस्पीटलमध्ये जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, भुसावळ, बोदवड, जामनेर व जळगाव ग्रामिण या क्षेत्रातील कोव्हिड-१९ बाधीत/संशयीत रूग्ण दाखल करण्यात येतील.

जिल्ह्यातील उर्वरीत क्षेत्रातील कोव्हिड-१९ बाधीत/संशयीत रूग्णांना पूर्व प्रमाणेच जिल्हा सामान्य रूग्णालय जळगाव व जिल्हा प्रशासनामार्फत घोषित करण्यात आलेले १) गणपती हॉस्पिटल जळगाव, २) गोल्ड सिटी हॉस्पिटल जळगाव याठिकाणी दाखल करता येणार आहेत.

सदर हॉस्पिटलमध्ये जे रूग्ण दाखल आहेत ते रूग्ण जसजसे बरे होतील त्यानुसार त्यांना डिस्चार्ज देण्यात यावा, तसेच जिल्ह्यातील महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये अंतर्भुत असणाऱ्या अन्य हॉस्पिटलमध्ये उपलब्ध बेड्‌सची संख्या विचारात घेऊन ज्या रूग्णांना अशा रूग्णालयामध्ये दाखल करणे शक्य आहे त्यांना संबंधित रूग्णालयात दाखल करावे. ज्या रूग्णांना या हॉस्पिटलमधून अन्य रूग्णालयात स्थलांतरीत करणे शक्य नसेल अशा रूग्णांना त्यांचेवरील उपचार पूर्ण झाल्यानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात यावा.

तसेच रूग्णांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व योग्य तो समन्वय ठेवण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून विनोद गायकवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि.प.जळगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या