Friday, April 26, 2024
Homeजळगावजळगावात नगरसेवकाकडे धाड, नगरसेवकासह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावात नगरसेवकाकडे धाड, नगरसेवकासह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव –
मयूर कॉलनीत भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्या घरी सुरू असलेल्या जुगारावर मंगळवारी रात्री पावणे बारा वाजता पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने धाड टाकली.

यात नगरसेवकासह बारा जणांविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींकडून १२ मोबाइल, तीन मोटारसायकलींसह एकूण दोन लाख ७४ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे.

- Advertisement -

पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनी येथे कुलभूषण पाटील यांच्या नवीन घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत जुगाराचा खेळ सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना मिळाली होती.

त्यांनी कर्मचारी किरण धमके, सुनील पाटील, राजेश चौधरी, रवींद्र मोतीराया, अशोक फुसे, सचिन साळुंके, विनयकुमार देसले व पंकज शिंदे यांचे पथक तयार केले. या पथकाने ही कारवाई केली.
यात पोलिसांनी संतोष बारी, रघुनाथ पाटील, समाधान चौधरी, पंकज पाटील, सचिन पाटील, नीलेश कोळी, धीरज पाटील, राजेंद्र भोई, मंगेश पाटील, पंकज पाटील, कुणाल रामसे व अनिल गव्हाळे यांना ताब्यात घेतले.

त्याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कुलभूषण पाटील यांच्या ताब्यातील घर असल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले. सर्व संशयितांना बुधवारी जिल्हा न्यायालयात हजर केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या