Thursday, April 25, 2024
Homeजळगावजळगाव : जिल्ह्यात आणखी 14 करोना बाधित रूग्ण आढळले; आतापर्यंत 257 बाधित...

जळगाव : जिल्ह्यात आणखी 14 करोना बाधित रूग्ण आढळले; आतापर्यंत 257 बाधित रूग्ण

जळगाव –

जिल्ह्यातील भुसावळ, जळगाव, पारोळा व चोपडा येथे स्वॅब घेतलेल्या 30 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 16 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 14 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

- Advertisement -

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील चार, भुसावळ येथील दहा रुग्णाचा समावेश आहे.

अहवालात जळगाव शहरात चार कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. या रुग्णांपैकी दोन रूग्ण हे आदर्शनगरातील आहेत. तर दोन रूग्णांनी पत्ता जळगावचा दिलेला असला तरी प्रत्यक्षात एक रूग्ण हा भुसावळचा तर एक रूग्ण हा धरणगाव येथील आहे. अशी माहिती महानगरपालिका रूग्णालयाचे डाॅ. रावलाणी यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 257 इतकी झाली असून त्यापैकी 45 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत तर तीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या