Friday, April 26, 2024
Homeजळगावजळगाव : करोना बाधित बेपत्ता महिला आढळली रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ

जळगाव : करोना बाधित बेपत्ता महिला आढळली रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ

जळगाव | प्रतिनिधी
जिल्हा कोविड रुग्णालयातील कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली बेपत्ता महिला शनिवारी सकाळी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बेवारस स्थितीत आढळली. हा प्रकार एका सामाजिक कार्यकर्त्याच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. याबाबत रुग्णालयाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना कळताच त्यांनी त्या वृद्धेला पुन्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

एरंडोल येथील या वृद्धेचा मुलगा सुमारे आठ दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्या मुलानंतर हायरिस्कमधील त्याच्या आईलाही वैद्यकीय पथकाने कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केले. ही वृद्ध महिला रुग्णालयातील परिस्थितीला वैतागून बाहेर निघाली. परंतु, तिची प्रकृती खूपच खराब असल्यामुळे ती रुग्णालयाच्या गेटजवळ बराच वेळ पडून होती. हा प्रकारा एका सामाजिक कार्यकर्त्याच्या लक्षात आला. त्याने त्या महिलेशी चर्चा केली. ती महिला एरंडोलची असल्याचे समजले.

- Advertisement -

सामाजिक कार्यकर्त्याने व्हीडीओ बनवून तो एरंडोल येथील त्याच्या काही परिचित मित्रांना पाठवला. ती महिला एऱंडोल येथीलच असल्याची खात्री झाली. तसेच या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मोठा अनर्थ टळला.

ही महिला रुग्णालयातून अचानक बेपत्ता झाल्याने रुग्णालयाच्या प्रशासनाने तिच्या केस पेपरवर ‘बेपत्ता’ असा शेरा मारला आहे. ही महिला प्रवेशद्वाराजवळ पडून असल्याचे कळताच रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी या महिलेस पुन्हा रुग्णालयात दाखल केले आहे. ही महिला बाहेर निघून इतरत्र फिरली असती तर तिच्यामुळे अनेकांना संसर्ग होण्याचा धोका वाढला असता. हा प्रकार एका सामाजिक कार्यकर्त्याच्या सतर्कतेमुळे लक्षात आल्याने संभाव्य धोका टळला. रुग्णालयातील वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णांवर नजर ठेवणे कर्मचार्‍यांना कठीण होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या