Type to search

Featured जळगाव

जळगाव : बसस्थानकातील बेकरीला शॉर्टसर्किटमुळे आग

Share
jalgaon

जळगाव | प्रतिनिधी
नवीन बसस्थानकाच्या परिसरातील बंद बेकरीच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे शनिवारी सकाळी १०.३० वाजता आग लागल्याने दुकानातील फ्रीज, ओव्हन आणि दुकानातील बेकरीचे साहित्य जळून खाक झाले. ही आग महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने विझाविली.

बसस्थानकावरील कॅन्टीनच्या आवारात नवनाथ रसवंतीच्या बाजूला असलेल्या साई बिस्कीट व बेकरीच्या दुकानाला सकाळी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही घटना पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर कार्यरत असलेल्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या महिला पोलीस सुनिता पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. ही आग वाहतूक पोलीस, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि काही नागरिकांनी विझविली.

वाहतूक महिला पोलीसची दक्षता
वाहतूक महिला पोलीस कर्मचारी सुनिता पाटील यांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी संबंधित विभागाला कळविल्यानंतर महानगरपालिकेचा बंब घटनास्थळी दाखल झाला. यावेळी बाजूच्या दुकानांना आग लागणार नाही याची दक्षता घेत पोलीसांनी बिस्कीट दुकानाचे कुलूप तोडून आत लागलेली आटोक्यात आणली. यावेळी दुकानातील दोन डीप फ्रिज, एक घरघुती फ्रिज, दोन काऊंटर, पाण्याच्या बाटल्या यांच्यासह लाखो रूपयांचा माल जळून खाक झाल्या आहेत.बसस्थानकाच्या आवारात असलेल्या बंद बेकरीच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आज सकाळी आग लागल्याने दुकानातील फ्रीज, ओव्हन व दुकानातील बेकरीचे साहित्य जळून खाक झाले आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमनाच्या बंबाने ही आग विझाविली.

बसस्थानकाच्या कॅन्टीनच्या आवारात नवनाथ रसवंतीच्या बाजूला असलेल्या साई बिस्कीट व बेकरीच्या दुकानाला आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या बाहेर कार्यरत असलेल्या वाहतूक महिला पोलीस सुनिता पाटील यांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीन पालिकेच्या अग्निशमन विभागाला संपर्क करून माहिती दिली. यावेळी वाहतूक पोलीस, जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि काही नागरीकांनी ही आग विझविली.
या वेळी बाजूच्या दुकानांना आग लागणार नाही, याची दक्षता घेत पोलिसांनी बिस्कीट दुकानाचे कुलूप तोडून आत लागलेली आग नियंत्रणात आणली. यात दुकानातील दोन डीप फ्रिज, एक घरगुती फ्रिज, दोन काऊंटर, पाण्याच्या बाटल्या आदी लाखो रूपयांचा माल जळून खाक झाल्या आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!