Type to search

Featured जळगाव

कोरोना इफेक्ट : दारूबंदीसह विजपुरवठा बंद; कापुसवाडी (ता.जामनेर) येथे निर्णय

Share
Jamner

रांजणी ता.जामनेर – वार्ताहर

कोरोना व्हायरसमुळे विज वितरण कंपनीचे कमी झालेले कर्मचारी व बंद पडलेले डिपीचे कार्यालये यामुळे जर डि.पी.जळाली तर ती लवकर मिळणार नाही व या आपात्कालीन परस्थितीत अजुन भर पडेल असे होऊ नये म्हणून कापुसवाडीचे सरपंच सौ. बद्रीबाई रंगलाल चव्हाण यांनी कोरोना कमेटीची मिटींग बोलाविली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य पो.पाटील ग्रामसेवक व वायरयन वाघमारे हजर होते. विज वितरणचे अधिकारी यांना पत्र देऊन सुचित केले. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. परीसरातील जनता संचारबंदीमुळे घरी बसुन आहे.

यामुळे मोठ्या प्रमाणात शेगडी-हीटरचा वापर होऊन डिपीला धोका होऊ शकतो व नंतर ती लवकर भेटणार नाही त्यामुळे गावाच्या अडचणी वाढतील तसे होऊ नये म्हणून उपाय योजना केली आहे. सकाळी ३ तास ५ ते ८ व सांयकाळी २.३० तास ५.३० ते ७ वीजपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तरी सर्व नागरिकांनी विजेचा काटकसरीने वापर करीत विजेची बचत करावी असे आवाहन मा सरपंच रंगलाल चव्हाण यांनी केले. गावी गावठी दारु विक्री बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला दारु पाडणारे यांना बोलावून त्यांना सक्त ताकीद देण्यात आली. गावात कुणीही विनाकारण फिरु नये तसे दिसल्यास त्याचेवर कारवाई करण्यात येईल तरी सर्व सदस्य, शिपाई, पो पा, ग्रामसेवक यांनी गावी गस्त घालुन लोकांनी घराबाहेर पडु नये असे सुचीत करावे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!