Friday, April 26, 2024
Homeजळगावचोपडा कोव्हिड-१९ : रूग्णालयातून शेवटचा रूग्णही बरा होऊन घरी परतला

चोपडा कोव्हिड-१९ : रूग्णालयातून शेवटचा रूग्णही बरा होऊन घरी परतला

साकळी तोडण्यात अडावद आरोग्य केंद्राला यश

अडावद ता चोपडा –

- Advertisement -

आज दि.२३ मे २०२० शनिवार रोजी अडावद शहरातील कोरोना पॉझिटिव्ह शेवटचा रुग्णाचा चोपडा कोव्हिडं-१९ रुग्णालयातून १४ दिवसात करना आजाराची कोणतीही लक्षणे दिसुन आली नाहीत किंवा गेल्या पाच दिवसात ताप अथवा इतर कोणतेही लक्षणे आढळून आली नाहीत.

त्यामुळे केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने निर्गमित केलेल्या नवीन मार्गदर्शक सुचने प्रमाणे चोपडा तालुक्यातील अडावद येथील शेवटच्या कोरोना मुक्त करण्यात येवून त्यास अडावद आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिके द्वारे घरी पोहचविण्यात आले.

यावेळी अडावद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत सरपंच पती, ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत रूग्णावर पुष्प फेकून व टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. अडावद येथील कोरोनाने ग्रस्त पाच रुग्णा पैकी दोन मयत झाले, व उरलेल्या तीनही रुगणाची सुटी करण्यात आली आहे.

कोव्हिडं-१९ आजारावर मिळालेल्या यशासाठी तसेच उल्लेखनीय कामगिरी बजावल्या बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव यांचे कडुन अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी तथा सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे व आशा सेविका आदींचे विशेष कौतुक केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या