Friday, April 26, 2024
Homeधुळेधुळे-पिंपळनेर : वार्सा येथे घराची भिंत कोसळून तरूण ठार ; वादळी वाऱ्यासह...

धुळे-पिंपळनेर : वार्सा येथे घराची भिंत कोसळून तरूण ठार ; वादळी वाऱ्यासह गारपीटीने मोठे नुकसान

धुळे-पिंपळनेर, वार्सा – वार्ताहर

पिंपळनेरसह पश्चिम पट्टयात आज तीन ते चार वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह गारांसह मुसळधार पाऊ झाला. अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले असून घराची भिंत कोसळल्याने ४२ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वादळात घरांचे व कांद्यांच्या चाळीचे, पत्रे उडून अनेक शेतकऱ्यांचा कांदा ओला झाला असून झाडे देखील उन्मळून पडले आहेत.

- Advertisement -

मयत एतवारी साव (वय 42) हल्ली मु.मोहगाव ता.साक्री असे नाव सापडलेल्या आधार कार्डवर आहे, परंतू तो वार्सा फाटा (ता.साक्री” येथे रहात होता. एतवारी साव हा राहणारा तसा झारखंड येथील असून 10 ते 12 वर्षांपासून मोहगाव ता.साक्री येथे राहत होता परंतु सध्या तो वार्सा फाटा ता. साक्री येथे सध्या भाडे तत्त्वावर घर घेऊन रहात होते.

ज्या घरांची भिंत पडली त्या घरात तीन भाऊ होते. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने घरांचे प्रथम पत्रे उडाले तसे ते दोन भाऊ बाहेर पळाले हा भिंतीच्या आड लपलेल्या होता परंतू पाउस जास्त वाढून वादळ व वारा जोरात सुटल्याने भिंत कोसळून यांच्या अंगावर पडून हा जागीच गतप्राण झाला असे प्रत्यक्षक्षदर्शीनी सांगितले.

नवापूर ते पिंपळनेर रस्त्यावर असलेल्या आंबापाडा ते वार्साफाटा दरम्यान असलेल्या निलगिरीचे मोठमोठे वृक्ष रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली. काही छोटी वाहने रामपुरा मार्गे कुडाशी वरून जातांना दिसली. तसेच शेतक-यांचे काद्यांचे मोठे नुकसान झाले असून, ब-याच शेतकऱ्यांचे डांगर मळे असल्याने त्यांचे, तसेच कारली, गिलके, दोडके यांची वेल देखील जमीन दोस्त झाली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या