Saturday, April 27, 2024
Homeधुळेधुळे : पायी जाणाऱ्या मजुरांसाठी महामंडळाने केली बसेसची व्यवस्था

धुळे : पायी जाणाऱ्या मजुरांसाठी महामंडळाने केली बसेसची व्यवस्था

महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेपर्यंत सोडणार- आगार प्रमुख महाजन

धुळे –

- Advertisement -

परप्रांतातील मजूर आपापल्या राज्यात जाण्यासाठी मोठ्या संख्येने पायीच निघाले आहेत. त्याची व्यवस्था करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाने बसेस सोडण्यात आलाय असून त्यांना महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमे पर्यंत सोडनण्यात येत आहे, अशी माहिती महामंडळाच्या धुळे आगार प्रमुख श्री महाजन यांनी दै देशदूत ला सांगितले.

गुजरात राज्यात आणि महाराष्ट्रात रोजगारानिमित्त आलेले परंतु लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या मजुरांना आता आपापल्या गावाची ओढ लागली आहे.

त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्राचे बंधन घालण्यात आले असले तरी ते मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणी विचारात घेता हजारो मजूर पायीच आपल्या गावाकडे निघाले आहेत.

एकीकडे उन्हाची तीव्रता वाढली असताना महामार्गावर अशा मजुरांचे लोंढे च्या लोंढे दिसत आहेत. यात महिला आणि बालकांचाही समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाने यांची दाखल घेऊन या मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाने आज सकाळ पासून या मजुरांना सोडण्यासाठी बसेसची व्यवस्था केली आहे.

शहरातील हॉटेल रेसिडेन्सी पार्क पासून तसेच शिरपूर टोलनाका आणि उड्डाणपुलापासून या बसेस मजुरांना घेऊन मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत सोडत आहेत, अशा माहिती श्री महाजन यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या