Saturday, April 27, 2024
Homeधुळेधुळे : मुलाने वडीलांच्या गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घालून केला खून; अनैतिक संबंध...

धुळे : मुलाने वडीलांच्या गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घालून केला खून; अनैतिक संबंध असल्याचा संशय

शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर येथीलल घटना

धुळे –

- Advertisement -

आपल्या पत्नीचे आणि वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन मुलाने कुऱ्हाडीचा घाव घालून बापाचा खून केला आहे. शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर येथे ही घटना घडली.

याबाबत रमाबाई अत्तरसिंग पावरा यांनी शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, दि २१ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मुलगा बिनाज्या पावरा याने कोंबडी कापुन भाजी बनविण्यासाठी सांगितले. यासाठी फिर्यादी रमाबाई अत्तरसिंग पावरा गावात तेल घेण्यासाठी गेल्या. मुलगा बिनज्या व सुन व नातवंड घरीच होते.

तेव्हा रस्त्यात फिर्यादी रमाबाई पावरा यांना यांचे पती अत्तरसिंग पावरा भेटले. कोबंडीच्या भाजीसाठी तेल आणण्यासाठी चालली आहे असे तिने सांगितले. हे ऐकून पती अत्तरसिंग पावरा घरी निघुन आले.

त्यानंतर तेल घेऊन रमाबाई राजाराम पावरा यांच्या मोटार सायकलीने घरी आल्या. घरी पोहचले असता तेव्हा घरासमोर पती अत्तरसिंग गिलदार पावरा हे मयत पडलेले दिसले.
त्यांचे गळ्याला दुखापत होवून रक्तबंभाळ झालेले होते. मुलगा बिनाज्या याच्या हातात रक्त लागलेले कुर्हाड होती. तेव्हा मुलगा बिनाज्या यास विचारले की, तु तुझ्या वडीलांना का मारले? यावर तो म्हणाला, तिला पण कुऱ्हाडीने मारुन टाकेल.

त्यानंतर राजाराम यांनी गावातील लोकांना बोलवुन आणले. लोकांनी बिनाज्या याच्या हातातील रक्ताने माखलेली कुर्हाड हिसकावून घेतली. आपली पत्नी व वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय बिनाज्या याला होता, असे यावेळी समजले. या बाबत शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे बिनज्या पावरा याच्या विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या