Thursday, April 25, 2024
Homeजळगावधुळे शहरात ४२ वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह ; घुसखोरीला आळा घालण्याची...

धुळे शहरात ४२ वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह ; घुसखोरीला आळा घालण्याची मागणी

धुळे – प्रतिनिधी

येईल येईल म्हणता म्हणता अखेर कोरोनाने धुळे शरहात प्रवेश केलाच. तिरंगा चौकातील एका 42 वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

यापूर्वी धुळ्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील विलीगिकरण कक्षात दोघांचा मृत्यू झाला असून पैकी एक मालेगावची तरुणी तर दुसरा साक्री शहरातील रहिवासी होता. त्यामुळे आधीच यंत्रणा सतर्क होती.

आता आढळून आलेला पॉझिव्ह रुग्ण हा धुळे शहरातीलच रहिवासी असल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनासह अयोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून तो संपूर्ण परिसर सील करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

छुप्या मार्गाने घुसखोरी

कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉक डाऊन सुरू असले, जिल्ह्याच्या सीमा बंदी असली तरी चोरट्या मार्गाने घुसखोरी सुरूच असल्याचे बोलले जाते आहे.

शेजारच्या मालेगाव शहरात कोरोना बधितांची संख्या 99 वर पोहचली असून मालेगावला ‘रेड झोन’ म्हणून जाहीर केले आहे. मात्र मालेगाव मधून चोरट्या मार्गाने धुळ्यात घुसखोरी होत असल्याचे बोलले जाते आहे. हीच परिस्थिती मध्यप्रदेश आणि शिरपूर तालुका सीमा भागातील असल्याने ही चोरटी घुसखोरी थांबविण्याची मागणी होते आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या