Friday, April 26, 2024
Homeजळगावचाळीसगाव : खासगी रूग्णालये बंद असल्याने रूग्णांचे हाल

चाळीसगाव : खासगी रूग्णालये बंद असल्याने रूग्णांचे हाल

चाळीसगाव – प्रतिनिधी

दवाखाने सुरू ठेवावे
खाजगी डॉक्टरांनी दवाखाने सुरु ठेवावेत. अन्यथा त्यांचेवर कायद्यान्वये गुन्हे दाखल करावे लागणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे.

चाळीसगाव शहरात समाजसेवेचा आव आणत आपल्या स्वार्थासाठी बरेच डॉक्टर मोफत तपासणी शिबीरे घेतात, परंतू आता स्वार्थासाठी शिबीरे घेणारे अनेक डॉक्टर गायब झाल्याची चर्चा आहे. या सर्वांनी कोरोनाच्या भितीने आपले दवाखाने सर्वसमान्यासाठी बंद केले आहेत. संचारबंदीच्या काळात गरीबांसाठी आमच्या रुग्णालयात मोफत तपासणी केली जाईल असा एकही उपक्रम कोणी राबवताना दिसत नाही. त्यामुळे आता शहारातील शिबीरे घेणारे डॉक्टर गेले कुठे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांडून उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

देशात कोरोना विषाणूच्या सक्रमाणपूर्वी शहरातील सर्वच खाजगी रूग्णालये दिवसभर रूग्णांच्या गर्दीने फुलुन जायची. काही रूग्णालयांमध्ये तर पाय ठेवायला जागा नसायची. त्या उलट परिस्थिती शासकीय रूग्णालयांमध्ये होती. तिकडे रूग्ण सहसा फिरकत नसे. पण आज परिस्थिती उलटी आहे.

सरकारी ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरु आहेत आणि सर्वसामान्यांसाठी तेच देवदूत ठरत आहेत, दुसरीकडे मात्र कोरोनाच्या भितीने शहरातील एखादा दुसरा अपवाद वगळता सर्वच खाजगी दवाखान्यांचे दरवाजे रूग्णांसाठी बंद आहेत. विपरीत परिस्थितीत या रूग्णालयांनी रूग्णांच्या मदतीला धावून जाणे गरजेचे असतांना हेच देवदूत डॉक्टरांनी स्वता; आपल्या सेवेपासून दुर नेत घरातच लॉकडाऊन करुन घेतल्याचे बोलले जात आहे.

कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकीय क्षेत्रातील अनेकजण अहोरात्र काम करीत असल्याची प्रेरणादायी कथा समोर येत असतांना कोरोनाच्या भितीने खाजगी वैद्यकीय सेवा मात्र गेल्या 15 दिवसापासून ठप्प आहे.नागरीकांना सध्या व बर्‍या होणार्‍या उपचारासही या रूग्णालयांकडून केवळ कोविड-19च्या भितीपोटी नकार दिला जात आहे. चाळीसगाव शहरातील अनेक खाजगी दवाखान्यांनी आपल्या ओपीडीही बंद केल्या आहेत. यामुळे कोविड-19शी दुरान्वये संबंध नसलेल्यांना कोरोना आपत्ती काळातही काही खाजगी हॉस्पीटलकडून नाकारण्याची भूमिका अयोग्य असल्याची चर्चा आहे.

एखादा रूग्ण गंभीर आजारी पडल्यास तो कोरोना बाधित नसेल तरीही त्यास वेळीच वैद्यकीय उपचार मिळाला नाही तर त्याचा मृत्यू ओढावण्याचा संभवच अधिक असतो. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात आपत्ती निवारण कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. काही खाजगी डॉक्टर आपले दवाखाने बंद ठेवत आहे. त्यामुळे नागरीकांना उपचार घेण्यात अडचणी निर्माण होत आहे. साधा खोकला, शिंक येणे, सर्दी, ताप यासारख्या आजारावरही उपचार करण्यास खाजगी दवाखान्यांमध्ये दरवाजे बंद व्हावेत हे योग्य नसल्याची भूमिका व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या