Saturday, April 27, 2024
Homeजळगावचाळीसगाव : शिवाजी महाराजांच्या बॅनरची विटंबन प्रकरणी फरार नगरसेवक पोलीसाच्या जाळ्यात

चाळीसगाव : शिवाजी महाराजांच्या बॅनरची विटंबन प्रकरणी फरार नगरसेवक पोलीसाच्या जाळ्यात

बहाळ शिवारातील शेतातून पोलिसांनी केली अटक

चाळीसगाव | प्रतिनिधी

- Advertisement -

शिवाजी महाराजाची प्रतिमा असलेल्या बॅनर विटंबना प्रकरणी चाळीसगाव पोलिस स्टेशनल दाखल गुन्ह्यातील, फारार भाजपाचे नगरसेवक राजेंद्र रामदास चौधरी यांना गुरुवारी रात्री २ वाजेच्या सुमारास बहाळ शिवारातील मक्क्याच्या शेतातून पोलिसांनी अटक केली.

राजेंद्र चौधरी हे सापडल्यामुळे पोलिसांनी आता सुटके निश्‍वास सोडला आहे. भाजपाचे नगरसेवक राजेंद्र रामदास चौधरी यांचे सीताराम पैलवान यांच्या मळ्यात अपार्टमेंटचे बांधकाम चालू आहे. याठिकाणी चाळीसगावात ‘माजी आमदार तथा विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी २० फेब्रुवारी २०१९ रोजी आयोजित ‘शिवस्मारक भूमीपूजन सोहळा’ आयोजनासाठी तयार केलेले बॅनर नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी मुतारीसाठी लावले होते.

त्यावर शिवाजी महाराजांचा फोटा असल्याने, शिवभक्त एका तरुणाने नगरसेवक राजेंद्र चौधरी यांना, त्याबद्दल जाब विचारला असता. नगरसेवक चौधरी यांनी आपले मुले व भावांच्या मदतीने तरुणासह त्यांच्या परिवारातील सदस्यांना घरात घुसून तलवारीने हल्ला करून मारहाण केल्याची घटना दि.६ रोजी घडली होती.

याप्रकरणी शिवप्रेमीच्या आदोलनानतंर अखेर चाळीसगाव पोलीस स्टेशनला राजेंद्र चौधरी यांच्यासह सहा जणांविरोधात भादवी कलम १४३,१४७,१४८,१४९,३०७,३५४,२९५(अ)३२३,३२४,५०४,५०६,४२७ प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

अखेर बुधवारी चाळीसगाव पोलिस स्टेशन पोलीस निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांना राजेंद्र चौधरी हे बहाळ शिवारात लपलेले असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या अनुषंगाने श्री.ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.मयुर भामरे, पोना.गणेश पाटील, पंढरीनाथ पवार, बापुराव भोसले, नितीन पाटील, भटू पाटील, राहुल गुंजाळ, संदिप पाटील, भूषण पाटील, संदिप पाटील अशांच्या पथकाने राजेंद्र चौधरी यांना बहाळ शिवारातील मक्याच्या शेतातून गुरुवारी रात्री २ वा. अटक केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या