Thursday, April 25, 2024
Homeजळगावसुखदवार्ता : चाळीसगावच्या सहा संशयितांचा अहवाल निगेटिव्ह ; १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन

सुखदवार्ता : चाळीसगावच्या सहा संशयितांचा अहवाल निगेटिव्ह ; १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन

चाळीसगाव | प्रतिनिधी

मालेगाव येथे कोरोनाग्रस्त रुग्णाच्या अंत्ययात्रेसाठी चाळीसगावातील एक जण गेल्याने, त्यांच्या परिवारातील पाच जण व रिक्षाचालक अशा सहा जणांना कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याच्या संशयावरुन खबरदारीसाठी दि,९ रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते, सर्वांना तात्काळ तपासणीसाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते.

- Advertisement -

या संशयित जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने (स्वॅब) घेऊन ते तपासणीसाठी धुळे पाठविण्यात आले आहे. त्यांचा तपासणीचा अहवाल (गुरुवारी रात्री) निगेटिव्हा आल्याची माहिती डॉ.नगोजीराव चव्हाण यांनी दिली आहे. परंतू पुढील १४ दिवसांसाठी या सहा जणांना होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती माविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी दिली आहे. त्या सहाचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे चाळीसगावकरांच्या जीवात-जीव आला असून गेल्या काही दिवसांपासून असलेल्या विविध चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.

मालेगाव येथे एका ५७ वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू नुकताच झाला होता. चाळीसगावातील एका परिवाराचे कोरोनाग्रस्त मयाताशी जवळचे संबंध होते. मयत रुग्णाच्या अंत्यविधीसाठी मालेगाव येथे या परिवारातील एक जण गेला होता. तसेच काही दिवसांपूर्वी देखील तो कोरोनाग्रस्ताच्या भेटीला गेल्याची माहिती आहे. त्यावरुन दि.९ रोजी चाळीसगाव पोलिसांना खरबदारी म्हणून त्यांच्यासह घरातील पाच जणांना ताब्यात घेतले. तसेच त्याना ग्रामीण रुग्णालयात घेवून जाणार्‍या रिक्षा चालक अशा सहा संयशियतांना ताब्यात घेतले होते.

यातील दोन जण ५० वर्षाच्या पुढील आहेत. तर तीन जणांचे वय २५ वर्षाच्या पुढील आहे, तर एकाचे वय १८ वर्ष आहे. या सर्वाची चाळीसगाव येथे प्राथमिक तपासणी करुन, पुढील तपासणीासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले होते. गेल्या सहा दिवसांपासून ते जळगाव येथील शाहु रुग्णालयात क्वारंटाईन होते. सोमवारी (दि.१३) रोजी या सहा संशयित जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने (स्वॅब) घेण्यात आले. व पुढील तपासणीसाठी मंगळवारी(दि,१४) धुळे पाठविण्यात होता. तो अहवाल गुरुवारी रात्री(दि.१६) प्राप्त झाला असून निगेटिव्ह आला आहे.

तसेच जिल्ह्यातील इतर जवळपास ३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. चाळीसगावातील या संशयितांच्या अहवालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह अल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. परंतू तरी देखील चाळीसगावकारंाना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ३५ अहवाल निगेटिव्ह
चाळीसगाव येथील संशयिताचे घशातील स्त्रावाचे नमुने (स्वॅब) घेऊन ते तपासणीसाठी धुळे पाठविण्यात आले आहे. त्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच जिल्ह्यातील ३५ जणांचे तपासणीचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत.
– डॉ.नगोजीराव चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक,जळगाव

पुढील १४ दिवस होम क्वारंटाईन
चाळीसगावाच्या सहा संशियातचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांना रुग्णालयातून आज घरी सोडण्यात येणार आहे. परंतू खबरदारीसाठी पुढील १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
– डॉ.भास्कर खैरे, अधिष्ठाता

- Advertisment -

ताज्या बातम्या