Tuesday, April 23, 2024
Homeजळगावभुसावळ : मायलेकांचा कुजलेला मृतदेह आढळला ; आरपीएफ बॅरेकजवळील गंगोत्री कॉलनीतील घटना

भुसावळ : मायलेकांचा कुजलेला मृतदेह आढळला ; आरपीएफ बॅरेकजवळील गंगोत्री कॉलनीतील घटना

भुसावळा –
येथील आरपीएफ बॅरेक जवळील गंगोत्री कॉलनीतील रहिवासी मायलेकांचा मृतदेह घराच कुजक्या अवस्थेत आढळून आला ही घटना दि. २८ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमरास दुर्गंधी येत असल्याने उघडकीस आली.

त्यामुळे शहरात खळबळ उडाली. याबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील आरपीएफ बॅरेक जवळील रहिवासी बबनबाई पाटेकर (वय ७०) व त्यांचा मुलगा सन्सेस डॅनियल पाटेकर (वय ५२) यांचा घरातच ४-५ दिवसांपूर्वी मृत्यू झाला असून मृतदेह घरातच पडून होते.

- Advertisement -

परिसरात दुर्गंधी परसल्यामुळे घरात पाहिले असता दोघा मायलेकांचे मृतदेह आढळून आले. मात्र दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मयत महिलेचा एक मुलगा मनमाड येथे वास्तव्यास आहे. त्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र त्यांनाही घरी येणे शक्य नसल्याचे सांगण्यात आल्याने मयतांच्या स्थानिक नातेवाईकांनी प्रशासनाच्या मदतीने त्यांच्यावर येथील अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत शहर पोलिसात नामदेव भाऊराव गायकवाड यांच्या खबरीवरुन अ.मृ. रजि. १४/२० प्रमाणे नोंद करण्यात आली असून तपास शहर पोलिस करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या