Friday, April 26, 2024
Homeजळगावभुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग : जीवित हानी टळली

भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग : जीवित हानी टळली

पाच बंब, सहा टँकरने चार तासात आगीवर नियंत्रण
भुसावळ –

तालुक्यातील खडका येथील एमआयडीसीमधील डिस्को इंटर प्राईजेस प्रा. लि. कंपनीला भिषण आग लागल्यामुळे अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशमन दलाचे पाच बंब व खाजगी टँकरने जवळपास चार तास प्रयत्न करण्यात आले. घटनास्थळी आ.संजय सावकारे अडीच ते तीन तास थांबून होते.

- Advertisement -

खडका एमआयडीसीमध्ये डिस्को इंटरप्राईजेस या कंपनीच्या परिसरात काही व्यक्तींनी वाळलेले गवत पेटविले होते. मात्र या गवताने लगेच आगीचे रुद्र रुप धारण केले. आग कंपनीच्या आत शिरली व कंपनीतील टीव्ही, खुच्या व फ्रीजचे स्टँड बनवीन्याचे मशीनसह दोन मालवाहू वाहने आगीच्या भक्षस्थानी पडले. सुदैवाने लॉकडाऊन व संचारबंदीमुळे सदर कंपनी बंद होती. त्यामुळे कंपनी कामगार नसले तरी एकच वाचमन उपस्थित होता. त्यांनी आगी संदर्भात कंपनीचे मालक कन्हैयालाल मिलकीराम मकडिया यांना फोनवरुन माहिती दिली. त्यामुळे मालक व परिवारीतल सदस्य घटनास्थळी पोहचले.

याबात खडका येथील पाटील सुरतसिंग पाटील यांनी तालुका पोलिस स्टेशन व भुसावळ न.पा.च्या अग्नीशमन दलाला माहिती दिली. व ते घटनास्थळी पोहचले. त्यामुळे न.पा. अग्नीशमन दलाचे दोन, आयुध निर्माणी भुसावळ, दीपनगर व जामनेर नगर पालिका असे प्रत्येकी एक असे एकुण पाच बंब व सहा टँकर घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तब्बल चार तास प्रयत्न करण्यात आले.

दरम्यान, आ. संजय सावकारे यांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. तर घटनास्थळी पं.स.चे माजी सभापती सुनील महाजन, माजी उपसभापती मुरलीधर (गोलू) पाटील, तहसीदार दीपक धिवरे, तलाठी मिलिंद देवरे, डिवायएसपी गजानन राठोड, तालुका पो.स्टे.चे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,स.पो.नि. अमोल पवार, पो.कॉं.विठ्ठल फुसे, अजय माळी, दाखल झाले. तर बाजारपेठ पोलिसांनीही आगीची भिषणता पाहुन घटनास्थळी भेट दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या