भुसावळ : करोना बाधित महिलेचा मृत्यू ; बाधित रूग्ण संख्या २१

jalgaon-digital
1 Min Read

भुसावळ – प्रतिनिधी

येथील काझी प्लॉट भागातील ७५ वर्षिय महिलेचा मृत्यू झाल्याचे आज उघडकीस आले आहे. दि.८ रोजी सदर महिलेला करोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता.

शहरात आतापर्यंत २१ जणांना करोनाची लागण झाली आहे. शहरातील खडका रोड भागातील महिला व गंगाराम प्लॉट भागातील पुरुष रुग्ण अशा दोघांचा दि.८ रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.

त्या पाठोपाठ काझी प्लॉट भागातील ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. या महिलेच्या संपर्कातील दहा जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. रुग्णाच्या संख्येप्रमाणेच मृतांच्या संख्येतही वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशासनाच्या वतीने करोनाबाधित रुग्णांच्या रहिवासी भागात पूर्णत: लॉक करण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच करोनावर प्रतिबंध घालण्यासाठी योग्या त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *